किरकोळ वादातून बस चालकाला मारहाण
किरकोळ वादातून बस चालकाला मारहाण
औरंगाबाद : किरकोळ वादातून बस चालकाला मारल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. बस चालक आणि एका नागरिकाचं भांडण झालं. त्यातून हा नागरिक लाठ्या काठ्या घेऊन या बस चालकाला मारायला आलाय असं यात दिसतंय.
यातून चालकाला बरीच मारहाण झाल्याची माहिती मिळतेय. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यतील हा व्हीडिओ असल्याचं बोललं जातंय.
या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. बसचालकानं चालवताना कट मारल्यानं हा वाद झाला. बस चालकानं हुल दिली म्हणून या नागरिकांनं आपल्या मित्रांसोबत येऊन बस चालकाला बेदम मारहाण केली अशी माहिती दिली जात आहे. याप्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.