गजानन देशमुख, झी मीडिया हिंगोली : औंरगाबाद जिल्ह्यातील फुलउंबरी येथून बुधवारी सहा वर्षीय बालकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका महाराजाने हे अपहरण केल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र लॉज चालकाच्या सतर्कतेमुळे या बालकाची हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील पोलिसांनी सुटका केली आहे. दिनेश कुलकर्णी असे या महाराजाच नाव असून तो अपहरण केलेल्या मुलाच्या गावात ये जा करत होता.

बुधवारी सकाळी दिनेश कुलकर्णीने मुलाचे अपहरण करुन पळ काढला. मुलाच्या कुटुबिंयांनी त्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. बऱ्याच शोधानंतरही तो न सापडल्याने पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी दिनेश कुलकर्णी अपहरण केल्यापासून त्या मुलाला घेऊन फिरत होतो. त्यानंतर तो गुरुवारी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील श्रीकृपा मंगल कार्यालय येथे लॉजवर राहण्यासाठी आला. त्यानंतर लॉज चालकाला त्यांच्या हालचालीवरून संशय आल्याने त्याने याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर अमावस्येच्या रात्री मुलाचा बळी देणार असल्याचा धक्कादायक माहितीही पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

आरोपीच्या गाडीत कीटकनाशके आढळली असून आम्ही स्वतःला संपवणार असा मजकूर लिहिलेली चिठ्ठीही आढळल्याचे औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही के झुंजारे यांनी सांगितले.

औंरगाबाद जिल्ह्यातील फुलउंबरी येथून बुधवारी सहा वर्षीय बालकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका महाराजाने हे अपहरण केल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.