औरंगाबाद: राज्यात काल रात्रीपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं हाहाकार सुरू झाला आहे.  पळशी खुर्द ते साखर वेल अंजना नदीवरील पुल वाहून गेला पळशी बुद्रुक पळशी खुर्द ते साखर वेल संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक घरात पाणी शिरले तर नद्या नाले दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तर नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोयगाव तालुक्यातील हिवरा नदीत  एक वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. बनोटी गावातील रहिवाशाने आपला जीव धोक्यात टाकून  यांचा जीव वाचवला आहे. 


हिवरा नदीला पूर आल्यामुळे ही नदी दुथडी वाहत होते. नदीच्या प्रचंड प्रवाहामध्ये एक व्यक्ती वाहून जात होता. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गावातील रहिवाश्याने आपला जीव धोक्यात घातला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 



औरंगाबादच्या कन्नड घाट मध्ये 3 ठिकाणी दरड कोसळली आहे, रात्रीतून पाऊस सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा आला आहे. दरड हटविण्याचे काम सुरु आहे. कन्नड तालुक्यातील नागद गावातील  गडदगड नदिला मोठा पूर आला. नदिलगत आलेल्या  बालाजी मंदिराच्या पायरिला पाणी लागलं. बाजूला  बालाजी भगवंताचे पुजारी कुटुंब नदिकाठी घर असल्याने त्याच्या घरात पाणी शिरलं.