औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांसाठी आज औरंगाबादमधल्या निराला बाजारमध्ये वाहतूक थांबवण्यात आली. मराठवाडा मुक्तीसंग्राम कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री इथे आले असता, त्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवण्यात आली. विशेष म्हणजे २०१५ मध्ये मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमासाठी वाहतूक थांबवण्यात आल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तेव्हा यापुढे अशा पद्धतीनं वाहतूक थांबवू नये अशा सूचना, मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हीआयपी संस्कृती आपल्याला मान्य नाही असं सांगत, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी ट्वीटरवरून दिलगिरीही व्यक्त केली होती. कदाचित औरंगाबाद पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या त्या सुचनेचा विसर पडला की काय असा प्रश्न आजच्या घटनेमुळे निर्माण होतो. 


दरम्यान आपल्यासाठी इतरांची वाहतूक थांबवण्यात आली हे मुख्यमंत्र्यांना सुद्धा गाडीतून दिसलंच. मात्र त्यांनीही याबाबत काही सुचना केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतःही आपलीच पूर्वीची सूचना विसरले की काय असा प्रश्न पडतोय.