औरंगाबाद : कॉपी बहाद्दर आजकाल कोणत्या थराला जातात याचा एक नमुनाच औरंगाबाद येथे पुढे आला आहे. एका बहाद्दरानं कॉपी करण्यासाठी थेट धमकीचं दिलीय. नोकरीसाठी 35 लाख रुपये भरल्यानं परीक्षेत पासं होणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी कॉपी करू द्या नाहीतर कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेन असं त्यानं म्हटलंय.


धमकी देऊन विद्यार्थी पळाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धमकी देऊन त्यानं थेट वर्गातून पळ काढला. प्रसंगावधान राखत कर्मचा-यांनी त्याला पकडून शांत केलं. नवखंडामधल्या डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमनच्या परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला. त्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आलीय. शिवाय विद्यापीठ स्कॉडलाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.


यापूर्वीही एका विद्यार्थ्याने मारली आहे इमारतीवरून उडी


 एमआय़टी कॉसलेजमध्ये कॉपी पकडली म्हणून सचिन वाघ या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच असा प्रकार घडल्यानं शिक्षण क्षेत्रात घबराट पसरलीय.