मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान २ जणांकडून आत्महत्येचा प्रयत्न
दोघांनाही रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
औरंगाबाद: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणखी दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न औरंगाबाद येथे केल्याचे वृत्त आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान नदीत उडी घेतल्याने काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी दोघांनी हे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. जयंत सोनावने (वय ३१), जगन्नाथ सोनावने (६० वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यात देवगांवर रंगारी येथे ठिय्या आंदोलन सुरू होते. येळगंगा नदीत जयंत सोनावने या तरूणाने उडी मारली. तर जगन्नाथ सोनावने यांनी विष प्राशन केले. हे दोघेही आंदोलनात सहभागी होते. दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.