औरंगाबाद : येथील टीव्ही सेंटर भागात एका पाणीपुरीवाल्याला नागरिकांनी चोप दिला. घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. या दुकानातील पाणीपुरी खाल्ल्याने काही मुलांना उलटी होऊ लागली. तर काहींना मळमळ होण्याचा त्रास होऊ लागला. त्या भागातील लोकांनी पाणीपुरीचा दुकान गाठले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं किडलेले आणि सडलेले बटाटे पाणीपुरीमध्ये वापरले जात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेच बटाटे खाण्याचा आग्रह नागरिकांनी दुकानदाराला धरला, पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सगळ्या घटनतेनंतर पाणीपुरी चालक आणि माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यामुळे हे प्रकरण शमले. मात्र पाणीपुरी खाल्ल्याने लहान मुलांना उलट्याचा त्रास झाल्याने लोकांनी मात्र पाणीपुरी विक्रेत्याला चोप दिला.