Ankai Hill forts:  नाशिक जिल्ह्यात असलेल्या अंकाई किल्ल्याजवळ मोठं भुयार आढळून आलं आहे. शेतात नांगरणी करताना जमिनीला मोठं भगदाड पडले. त्यानंतर खोलवर पाहाणी करताच जमिनीच्या आत भुयार असल्याचे आढळले. किल्ल्याजवळच भुयार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंबंधी पुरातत्व विभागाला माहिती देण्यात आली आहे.  अनकाई किल्ला राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित घोष‌ित केला आहे. (Nashik Ankai Fort)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येवला शहरापासून जवळ असलेल्या ऐतिहासिक अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी एका शेतात भुयारी मार्ग आढळून आला आहे. शेतकरी शेतात नांगरणी करत असताना जमिनीला एक मोठं भगदाड पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी घाबरला त्याने लगेचच मोबाईलवरून तलाठी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच सर्वांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.


ग्रामस्थांनी किल्ल्याच्या शेजारी असलेल्या शेतात भुयारी मार्ग आढळल्याची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे. मात्र, हा भुयारी मार्ग कुठपर्यंत जातो, किल्ल्यापर्यंत हा मार्ग जातो का? हे आता पुरातत्व विभागाने पाहणी केल्यानंतरच समजणार आहे. 


कुठे आहे अंकाई किल्ला?


नाशिक जिल्ह्यात अंकाई किल्ला आहे. गाळणा रांगेतील येवल्याजवळ हा किल्ला आहे. या किल्ल्याला अनकाई असंही म्हणतात. अंकाई किल्ल्याच्या बाजूलाच टनकाई किल्लादेखील आहे. अंकाई किल्ल्याचा वापर यादव काळापूर्वीपासून टेहळणी नाका म्हणून केला जात असे. हा किल्ला यादवकालीन असून, देवगिरीचे यादव सम्राट सिंघणाच्या (इ.स.१२००-१२४७) कारर्कीदीत तो परमारांच्या ताब्यात होता. यादवांनी परमारांचा किल्लेदार श्रीधर याला फितूर करून हा किल्ला जिंकला. पेशव्यांनीही अनकाई-टनकाई आपल्या ताब्यात असावा यासाठी धडपड केलेली दिसते. १७३४ च्या शेवगावच्या तहानुसार किल्ला मराठ्यांना देण्याचे निजामाने कबुल


अंकाई किल्ल्यावर कसे जालं?


नाशिकहून येवल्यात आलात की मनमाड मार्गावर दहा-बारा किलोमीटरवर अनकाई हे गाव आहे. अनकाई फाट्यावरून उजव्या हाताने वळालात की समोर अनकाई-टनकाई जोडगोळी डोंगर दिसतात. वेशीतून गावात गेल्यावर समोर दगडी मठ पहायला मिळतो. अनकाई डोंगराच्या पायथ्यापासून शंभर एक पायऱ्या चढल्यावर जैन लेणी लागते. गावातून लेणीपर्यंत व तेथून किल्ल्यापर्यंत पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे


किल्ल्यावरील बुरुज आणि तटबंदी आहे. किल्ल्यावर अनकाई देवीचे मंदिर आहे. तसंच, सात लेण्यादेखील आहेत. श्रावणातील दर सोमवारी किल्ल्यावर मोठ्या संख्येने गर्दी होते. अनकाईवर मच्छिद्रनाथांची समाधी असल्याचेही ग्रामस्थ मानतात. त्यांना मोठा बाबा असेही म्हटले जाते.


रामायणातील संबंध


अंकाई किल्यावर अगस्ती ऋषींचा आश्रम असल्याचे पुराणात नोंद आहे. किल्ल्यावर अगस्ती ऋषींचीची गुफा असून तेथे मूर्ती व पाण्याचे तळे आहे. या तळ्याला काशी तळे असेही म्हटले जाते. या तळ्याच्या मधोमध अगस्ती ऋषींची समाधी असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. सीतेचे हरण झाल्यानंतर सीतेला शोधण्यासाठी निघालेल्या रामाची व अगस्तींची येथेच भेट झाली होती, अशी आख्यायिका ग्रामस्थ सांगतात.