पुणे : अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक ट्रॅप होता असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Ayodhya Tour) यांनी केलाय. त्यांच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. राज ठाकरे यांच्यासाठी कुणी ट्रॅप लावला यावरून तर्क वितर्कांना उधाण आलंय. (ayodhya tour was a trap raj thackeray sensational allegation)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून राज्यासह यूपीतलं वातावरण पेटलेलं असतानाच राज ठाकरेंनी हा दौरा रद्दा केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर आता राज ठाकरेंनी मोठा गोप्यस्फोट केला. अयोध्या दौऱ्याला विरोध म्हणजे मोठा ट्रॅप होता आणि त्यालामहाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा खळबजनक आरोप राज ठाकरेंनी केला. 


राज ठाकरेंच्या याच आरोपाचा धागा पकडत महाविकास आघाडीनं भाजपला लक्ष्य केलंय. भाजप पुरस्कृत दौऱ्यावर उत्तर प्रदेशात कोण गुन्हा दाखल करणार? असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी केलाय. तर काँग्रेसनेही भाजपवर निशाणा साधलाय.


राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द करण्यामागे ट्रॅपचं कारण दिलं असलं तरी यामागे कोण आहे, हे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे यावरून तर्क वितर्कांना उधाण आलंय. मात्र राज ठाकरेंच्या बॉम्बगोळ्यानं राजकीय वर्तुळात चांगलाच धूर निघालाय एव्हढं मात्र नक्की.