बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी; राजकीय नेत्यांसह कलाकारांचीही उपस्थिती
बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्समधील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी झाला. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राजकीय नेत्यांसह कलाकार ही उपस्थित होते.
Baba Siddique Funeral : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं. तिथे जनाजाची नमज वाचण्यात आली. त्यानंतर मानवंदना दिल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर दफनविधी झाले. त्याआधी त्यांची अंत्ययात्रा रात्री 8 वाजता वांद्रेमधील त्यांच्या घरातून निघाली. जनाजा नमाजचं पठण केल्यानंतर सिद्दीकींची अंत्ययात्रा सुरु झाली. यावेळी पाऊस पडत असतानाही सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. दरम्यान दिवसभरामध्ये सिद्दीकींचं अंत्यदर्शन घेण्यासाठी, तसंच्या त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी विविध राजकीय नेते तसंच बॉलिवुडमधील कलाकार त्यांच्या घरी येऊन गेले.
दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. आरोपींनी त्यांच्यावर 3 राऊंड फायर केले. त्यांच्या छातीत एक गोळी लागल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी गुरूमित सिंहला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये...तर बचाव पक्षाच्या वकिलांनी एक आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा केला होता...त्याची वैद्यकीय चाचणी करून पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत...तोपर्यंत त्याला पोलिसांच्या ताब्यात रहावं लागणारे.... दरम्यान झिशान अख्तर या चौथ्या आरोपीची ओळख पटली असून, पोलीस त्याचा शोध घेताहेत.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचं पथक उज्जैनला पोहोचलं आहे. सकाळपासून मुंबई पोलिसांच्या पथकानं उज्जैन पोलिसांसोबत शोध मोहीम राबवली. मुंबई क्राईम ब्रँचचं 7 जणांचं पथक उज्जैनमध्ये तपास करत आहे. तिथे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 2 संशयित असल्याची माहिती पोलिसांनी मिळालीये. हे दोघे संशयित लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याची पोलिसांची माहिती आहे. योगेश भाटी आणि राजपाल सिंह अशी त्यांची नावं आहेत. विशेष म्हणजे सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात याआधी NIAने या दोघांची चौकशी करुन त्यांना सोडलं होतं.
अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आलीये. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरची पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संबंध असल्याचं समोर आल्यानंतर सुरक्षेत वाढ केलीये..