Uddhav Thackeray Allegations On Mahayuti: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते बाबा सिद्धीकी यांची काल हत्या करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली. गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी झाली आहे.जनतेसह नेतेही असुरक्षित आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भ्रष्टाचारी सरकारविरोधातील आरोपपत्र घेऊन आम्ही जनतेच्या न्यायलयात जाणार आहोत. हे सरकार केवळ जाहिरातबाजीवर पैसे खर्च करतंय. जाहिरातबाजीऐवजी जनतेच्या सुरक्षेवर पैसे खर्च करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


पोलिसांचा उपयोग या गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जातो. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत? गद्दारी करुन आलेल्यांना आणि त्यांच्या घरच्यांना किती सुरक्षा आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला. 2 ते 3 दिवसात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सरकार एका मागोमाग एक निर्णय घेतंय. पण अमंलबजावणी कशी होणार? हे सांगत नाही. महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीकाही त्यांनी केली.


काय म्हणाले पवार?


सिद्धीकी हत्या प्रकरणाबद्दल फारशी माहिती नाही. तपासावर परिणाम होईल असं काही म्हणणार नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले. रिझल्ट देता येतं नाही त्यांनी घरी बसावं, असेही ते म्हणाले. दीड महिन्यात मंत्रिमंडळात किती निर्णय घेतले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या हातातून सत्ता घ्यावी लागेल. सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.