मालेगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर ( Babasaheb Ambedkar ) यांची १३१ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत आहे. आंबेडकर अनुयायी वेगवेगळ्या पद्धतीने ही जयंती साजरी करताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या मालेगावातील चित्रकार संदीप आव्हाड ( artist Sandip avhad ) यानेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केलंय. या तरुणानं भीमकन्या कडुबाई खरात ( kadubai kharat ) यांचं गाजलेलं आणि लोकप्रिय झालेलं 'आम्ही खातो त्या भाकरीवर' या गाण्याच्या पंक्ती प्रत्यक्षात अंमलात आणल्या आहेत.


भीमकन्या कडुबाई खरात यांनी आपल्या गाण्यात म्हटलं होत की,


मायबापाहून भीमाचे उपकार लई हाय रं


तुमी खाता त्या भाकरीवर, आम्ही खातो त्या भाकरीवर


बाबासायबाची सही हाय रं


चित्रकार संदीप आव्हाड याने बाजरीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय सुंदर असं चित्र साकारलं आहे. भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रकाढून मालेगावच्या चित्रकाराचे अनोखे अभिवादन केलंय. या सुंदर चित्राची आणि ते काढणाऱ्या त्या कलाकाराची सर्वत्र चर्चा होतेय.