Babri Demolished: बाबरी पाडली तेव्हा भाजपचीच मंडळी तिथे होती. बाकी शिवसेनेचे कोणीच नव्हते असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांनी बाबरी पाडतानाच्या आठवणी सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली. मंदीर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे असं आम्हाला हिणवलं जायचं. पण मोदींच्या नेतृत्वात आम्ही हे करुन दाखवलं, असेही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबरी मशिद पाडली होती तेव्हा तिथे भाजपसोडून कोणीच नव्हते. हे केवळ वाचाळवीर आहेत. कुठल्या संघटनेने क्रेडीट घ्यायचे नाही, कारसेवकांनी मशिद पाडली सांगायचे, असे आम्हाला सांगण्यात आले होते. आम्ही शिस्त पाळणारे होतो. म्हणून आम्ही कारसेवकांचे नाव सांगितले. दरम्यान कोणीतरी बाळासाहेबांना प्रश्न विचारला, तुमच्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली का? तेव्हा त्यांनी माझ्या शिवसैनिकांने बाबरी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे विधान केल्याची आठवण फडणवीसांनी करुन दिली. 


बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते तिथे होते, असे फडणवीसांनी सांगितले. 


मराठवाड्याला विकासासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागायची. पण आता आमच्या सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने वेगाने कामे सुरु केली आहेत. वंदे भारत थेट मुंबईशी कनेक्ट करते. विमानाच्या वेळांच्या अनेक अडचणी येत होत्या. 2014 ते 2019 मध्ये आम्ही मराठवाड्यासाठी वेगाने कामे केली पण मधल्या काळात कामे झाली नाहीत. बुलेट ट्रेनसाठी 78 टक्के जमिन आपल्याकडे आहे. 22 टक्के जमिनीची पूर्तताही लवकरच होईल असे ते म्हणाले. 


देवेंद्र फडणवीसांचा 2024 साठी काय संकल्प? 


जी जबाबदारी मिळाली आहे त्याचा वापर करुन महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी आणि सर्वांगिण विकासासाठी काम करायचे आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करायचा असे त्यांनी सांगितले.