Jalgaon News :  नवजात बाळांची अदलाबदली झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात घडला होता. यामुळे  रुग्णालयाच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते.  दोन गर्भवती महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली होती. यामुळे बाळांची अदलाबदली झाली होती. कुणाचं कुठलं बाळ हे ठरवण्यासाठी बाळांची आणि पालकांची डीएनए टेस्ट करण्यात आली.  DNA टेस्टचे रिपोर्ट आले आहेत. अखेरीस ही बाळ त्यांच्या आई कुशीत आली आहेत. 
2 मे रोजी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला होता. दोन महिला प्रसुतीसाठी आल्या होत्या. दोघींची सिजेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला. ही नवजात बाळं पालकांकडे सोपवताना प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि नर्सेसकडून गोंधळ झाला आणि बाळांची अदलाबदली झाली. 


अदलाबदलीची पोलिस ठाण्यात तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नवजात बालकांची अदलाबदल झाल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. नवजात बालकांचे खरे पालक शोधण्यासाठी आरोग्य प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय. अखेर आता कुणाचं कुठलं बाळ हे ठरवण्यासाठी बाळांची आणि पालकांची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत बाळं हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आली.


15 दिवसानंतर आला DNA टेस्टचा रिपोर्ट


अखेरीस  15 दिवसानंतर  DNA टेस्टचा रिपोर्ट आला आहे.  जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चुकीच्या सूचनेमुळे बाळांची अदलाबदल झाल्याच्या गैरसमज प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.  कुणाचं कुठलं बाळ यावरुन गोंधळ झाल्याने ही  बाळे आई पासून दूर होती.  दोन्ही माता आणि बाळ यांचे डीएनए नमुने घेऊन नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. अखेर DNA रिपोर्टनंतर ही दोन्ही बाळे अखेर त्यांच्या मूळ मातांच्या कुशीत विसावली आहेत. बाळांना आपल्या कुशीत घेताना दोन्ही माता भावुक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.


डॉक्टरच करत होते नवजात बाळांची खरेदी विक्री 


उल्हासनगरमध्ये एक डॉक्टरच नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी विक्री करत असल्याचं समोर आलंय. कॅम्प नंबर 4च्या कंवरराम चौक परिसरात महालक्ष्मी नर्सिंग होममधील डॉक्टर चित्रा चेनानी आपल्या टोळीच्या माध्यमातून नवजात बाळांची खरेदी विक्री करायच्या. सामाजिक संस्थांनी बनावट ग्राहक पाठवून याचा भांडाफोड केला.