Breaking News! बदलापूर शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या समोर आल्या `त्या` मुली, पुढे जे झालं...`
Badalapur school minor Girl exploitation: बदलापूर लैंगिक शोषणप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलींसमोर ओळख परेड झाली आहे.
Badalapur school minor Girl exploitation: बदलापूरच्या एका शाळेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला होता. या घटनेंचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. आरोपी अक्षय शिंदे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. बदलापूर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. यात आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलींसमोर ओळख परेड झाली आहे. यानंतर आरोपीच्या गुन्ह्यावर शिक्कामोर्तब होण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
अक्षय शिंदेची अखेर ओळख परेड
बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची अखेर ओळख परेड झाली.कल्याण न्यायालयमध्ये एका विशिष्ठ रूम मध्ये ही ओळख परेड झाली. विशेष म्हणजे यात आरोपी पीडित मुलींना पाहू शकत नव्हता.मात्र मुली आरोपीला पाहू शकत होत्या. अशा पद्धतीने कोर्ट रूममध्ये काळजी घेण्यात आली होती. बदलापूर प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआटीने न्यायालयात आरोपीच्या ओळख परेडसाठी परवानगी मागितली होती,त्यानुसार ही ओळख परेड झाली.
संतप्त जमाव उतरला रस्त्यावर
बदलापूर येथील एका नामांतर शाळेत तीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. शाळेतीलच सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांनी चिमुरडींनी स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले होते. पीडित चिमुकलीच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाल्यानंतर तिने तिच्या पालकांना सांगितले. जेव्हा त्यांनी वैद्यकीय तपासणी केली तेव्हा हा सगळा प्रकार उघड झाला आहे. या घटनेनंतर बदलापूरात पालकांचा पोलिस आणि शाळा प्रशासनाविरोधात एकच भडका उठाला. 20 ऑगस्टरोजी मोठ्या संख्येने पालक आणि रहिवाशी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्यानंतर या प्रकरणात सरकारने एसआयटी स्थापन केली. आता या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.
आणखी काही मुलींसोबत असे प्रकार?
बदलापूर अत्याचार प्रकरणात एसआयटी सजग राहून तपास करत आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने आणखी काही शक्यता मांडल्या आहेत. शाळेतील आणखी काही मुलींसोबत असे प्रकार झाले असल्याच्या संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळं शिशुवर्गात शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना एसआयटीकडून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. शाळेतील आणखी काही मुलींसोबत असे प्रकार झाले असल्याचं पालकांनी समोर यावं, असं अवाहन एसआयटीने केलं आहे.
आणखी काही मुलींसोबत दुष्कृत्य केलंय का?
सध्या सरकारने जी चौकशी समितीने नेमली आहे त्यात एसआयटीचा समावेश आहे. एसआयटीच्या तपासानुसार, नराधम अक्षय शिंदे हा 15 दिवस स्वच्छता कर्मचारी म्हणून त्या शाळेत काम करत होता. या 15 दिवसांत त्याने आणखी काही मुलींसोबत दुष्कृत्य केलंय का? याचा शोध तपास यंत्रणांकडून घेत आहेत. त्यामुळं तपास यंत्रणांनी शाळेतील मुलींच्या पालकांना मेसेज पाठवले आहेत. मुलींबाबत असा काही प्रकार घडलेत का तर पुढे या आणि तक्रार करा. जेणेकरुन अक्षय शिंदेविरोधात आणखी पुरावे गोळा करण्यात येतील. तपास यंत्रणांने तसे एसएमएस मुलींच्या पालकांना केले आहेत. त्यामुळं आता आणखी काही पालक समोर येताहेत का? की या प्रकरणाला नेमकं काय वळण येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.