Akshay Shindes Death Controversy: बदलापूरच्या एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. यानंतर आठवडाभराने म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आली. ही घटना समजताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. आरोपी अक्षय शिंदेला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी अक्षय शिंदेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय शिंदेची कोठडी आजची संपली होती. त्यासाठी त्याला कोर्टात घेऊन जाणार होते.पण अक्षयने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी घालून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदेने जेलमधल्या पोलिसांकडून रायफल हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. याच झटापटीत एक गोळी अक्षय शिंदेला लागली तर एक गोळी पोलिसांनाही लागलीय.अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून हे एन्काऊंटर असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. 


हैदराबाद प्रकरणातील आरोपींचे अशाच प्रकारे एन्काऊंटर झाले होते. खरंच ते आरोपी होते का? हे पाहिले नाही आणि फाईलच बंद करण्यात आली. आता अक्षय शिंदेच्या बाबतीतही तेच झालाय.स्वसंरक्षणाचा बनाव म्हणत एन्काऊंटर केला गेलाय. अक्षय शिंदेचा आवाज बंद करुन कोणाला वाचवलं जातंय? असा प्रश्न त्यांनी विचारला. 


जर अक्षय शिंदे जर हिंस्र होता, त्याने 2 राऊंड फायर केले असं म्हणतायत, तो इतका तरबेज होता तर तशी व्यवस्था का नव्हती? आपण कसाबवरदेखील खटला चालवला होता. पहिल्या दिवसांपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. अक्षय शिंदेचा आवाज बंद करुन कोणाला फायदा? आपल्याकडे गुन्हेगाराला बाजू मांडायला मिळते. जे कोणी पोलीस ड्युटीवर होते, ते तात्काळ निलंबित झाले पाहिजेच. ज्यांनी ड्युटी लावली त्यांची चौकशी केली पाहिजे.