बदलापूर : बदलापूरच्या कात्रप भागातील रहिवासी असलेला अक्षय कांबळे हा आयआयटीचा विद्यार्थी गेल्या १८ दिवसांपासून कानपूरमधून बेपत्ता झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेश मधील आयआयटी कानपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या तिस-या वर्षात अक्षय शिकत होता. २९ नोव्हेंबरला अक्षय कानपूरहून घरी येण्यासाठी निघाला होता. तसा फोनही त्याने आपल्या आईला केला. मात्र, आजवर तो घरी परतलाच नाही.


गेल्या अठरा दिवसांपासून अक्षयचे आई-वडिल त्याचा शोध घेतायत. युपीच्या कल्याणपूर पोलिसात अक्षय बेपत्ता झाल्यीच तक्रार त्याच्या वडिलांनी दाखल केलीय.


पोलीस सहकार्य करत नसल्याची भावना कांबळे कुटुंबीयांची झालीय. त्यामुळे राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी अक्षय शोधण्यासाठी कानपूर पोलिसांवर दबाव आणावा अशी मागणी त्याच्या पालकांनी केलीय.



आयआयटी कानपूरमध्ये शिकत होता अक्षय