Balasaheb Thackeray Birth Anniversary : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिणींनो... हे शब्द जरी कानावर पडले की सर्वांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) आठवण होते. भाषणाची सुरूवातच बाळासाहेब ठाकरे या वाक्याने करायचे आणि लाखोंच्या संख्येने जमलेल्या जनतेच्या टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती असून पंतप्रधानांपासून ते सर्व राजकीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. (Balasaheb Thackeray Birth Anniversary Who is the little boy with Balasaheb in the photo) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर बाळासाहेबांना अभिवादन करतानाचे स्टेटस पाहायला मिळत आहे. यामध्ये बाळासाहेबांची दसरा मेळाव्यातील भाषणांमधील क्लीप आहेत. अशातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून त्यामध्ये बाळासाहेबांजवळ एक लहान मुलगा बसलेला असल्याचं दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातीलच एका व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला गेला आहे. अनेकांना वाटलं की हा मुलगा राज ठाकरे (Raj Thackeray) किंवा उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आहेत मात्र हा मुलगा आता शिंदे गटाशी संबंधित आहे.


फोटोमधील हा लहान मुलगा निहार ठाकरे आहे. बाळासाहेबांचे सुपुत्र बिंदूमाधव (Bindumadhav Thackeray) यांचा निहार ठाकरे हा मुलगा आहे. बिंदूमाधव यांचं  1996 साली अपघाती निधन झालं होतं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहारचे सख्खे काका तर राज ठाकरे हे  चुलत काका आहेत. निहार ठाकरे यांची पत्नी अंकिता हर्षवर्धन पाटील (Ankita Harshvardhan Patil) यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या आहेत. 


दरम्यान, निहार ठाकरे (Nihar Thackeray) हे वकील असून त्यांची एक फर्म आहे. निहार ठाकरे हे शिंदे गटाकडून उभे असून कायदेशीर लढाईमध्ये आपण एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे उभा असेल असं निहार ठाकरे यांनी सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये निहार शिंदे गटाकडून बाजू मांडताना दिसले आहेत.