बाळासाहेब थोरातांना आठव्यांदा विधानसभेत प्रवेश करण्याचा मान
संगमनेर मतदारसंघातून आठव्यांदा प्रतिनिधित्व
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आठव्यांदा आमदार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातून विजय मिळवत आठव्यांदा ते विधानसभेत पोहोचले आहेत. संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात 61 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
या यादीत शेतकरी नेते गणपतराव देशमुख सर्वात वर आहेत. सांगोला मतदारसंघातून ते अकरा वेळा निवडून आले होते. गणपतराव देशमुख हे 93 वर्षाचे आहेत. त्यांनी 13 वेळा निवडणूक लढवली. ज्यामध्ये 11 वेळा त्यांनी विजय मिळवला. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली. त्यांच्य़ा जागी त्यांचा नातू अॅड. अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढविली. पण त्यांचा पराभव झाला.
बाळासाहेब थोरातांनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातवेळा विधानसभेत प्रवेश करतील. राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील हे देखील सहाव्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्यापाठोपाठ विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे सहाव्यांदा, भाजप नेते गिरीश महाजन सहाव्यांदा निवडून आले आहेत.
विधानसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार 7 वेळा निवडून गेले आहेत. ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी देखील सहा वेळा निवडणूक जिंकली आहे. दिलीप वळसे-पाटील 1990 मध्ये राजकारणात आल्यानंतर ते देखील 6 वेळा आमदार झाले आहेत.