अहमदनगर : भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वतःला बाजीप्रभू देशपांडेंची उपमा दिली. काँग्रेस पक्ष अडचणीत असताना मी इतरांसारखा पळून गेलो नाही, तर बाजीप्रभूप्रमाणे काम करतोय, असा टोला थोरातांनी लगावला. संगमनेर तालुक्यातील निझरनेश्वर इथं संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करताना त्यांनी विखेंवर हल्ला चढवला. सरड्याला हरवणारे आणि त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलणारे लोक आता राज्यात दिसायला लागलेत, असेही ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी थोरात यांनी भाजप अधिक अमित शाह यांच्यावर टीका केली. पाच वर्षातले हे अपयशी सरकार आहे. भटकावणाऱ्या मुद्दयावर जनता आता विश्वास ठेवणार नाही. भावनिक मुद्दयावर लोकसभा निवडणुकीत फायदही झाला असेल मात्र विधानसभा निवडणुका स्थानिक प्रश्नांशी निगडीत असतात,  हे त्यांनी लक्षात ठेवावे. जनता आता फसणार नाही.


दरम्यान, सर्व विभागात देश पातळीवरचे युवा प्रचारक आहेत ते सक्रीय होतील. ज्योतीरादीत्य शिंदे , सचिन पायलट यांचीही मागणी होत आहे. अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका आणि राहुल गांधीनाही आम्ही आमंत्रित करत आहोत. तर उर्मिला मातोंडकर या बौद्धिक , पुरोगामी विचाराने त्या प्रगल्भ आहेत. त्यांचा उपयोग करून घेतला पाहीजे, असे यावेळी थोरात म्हणालेत.