Bank Holidays 2022 : ऑक्टोबरचे 10 दिवस बाकी, त्यात 6 दिवस सुट्ट्या, बँकेची काम करायची तरी कशी?
Diwali Bank Holidays: ऑक्टोबर (October) महिन्याच्या या शेवटच्या 10 दिवसांमध्ये, बँका सुमारे सहा दिवस बंद राहतील. जाणून घेऊया या काळात कोणत्या शहरात सुट्टी असेल?
Diwali Bank Holidays: ऑक्टोबर (October) महिन्याच्या या शेवटच्या 10 दिवसांमध्ये, बँका सुमारे सहा दिवस बंद राहतील. देशातील अनेक शहरांमध्ये जवळपास संपूर्ण आठवडा बँका बंद राहतील. जाणून घेऊया या काळात कोणत्या शहरात सुट्टी असेल?
ऑक्टोबर महिन्यातील आता फक्त 10 दिवस बाकी आहेत. या दहा दिवसात दिवाळी आणि आणखी काही सणांमुळे बँका बंद असणार आहेत. ऑक्टोबरच्या या शेवटच्या 10 दिवसांमध्ये जवळपास सहा दिवस बँका बंद (Banks Holidays) असणार आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये जवळपास संपूर्ण आठवडा बँका बंद राहतील. तुमच्या शहरात बँका कधी चालू कधी बंद जाणून घ्या...
22 October 2022 - धनत्रयोदशी आणि चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद असणार आहे.
23 October 2022 - 23 तारखेला रविवार असल्याने संपुर्ण देशात बँका बंद असणार आहे.
24 October 2022 - काली पूजा/दिवाळी/नरक चतुर्दशीमुळे गंगटोक, हैदराबाद आणि इम्फाळ वगळता संपूर्ण देशात बँक सुट्टी असेल.
25 October 2022 - गंगटोक, हैदराबाद आणि इम्फाळ वगळता लक्ष्मीपूजन/दिवाळी/गोवर्धन पूजेमुळे सुट्टी असेल.
26 October 2022- गोवर्धन पूजा/विक्रम संवत नवीन वर्षाचा दिवस/भाई दूज/दिवाळी/बली प्रतिपदा/लक्ष्मी पूजा/प्रवेश दिन- अहमदाबाद, बेंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, सिमला, श्रीनगरमध्ये बँक बंद राहणार आहे.
27 October 2022 - गंगटोक, इंफाळ, कानपूर आणि लखनऊमध्ये भाई दूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मीपूजा/दीपावली/निंगोल चक्कुबामुळे बँका बंद राहतील.
बँकांच्या ऑनलाईन सेवा सुरू (Online services of banks) -
सणासुदीच्या काळात बँकांच्या शाखांना सुटी असल्याने बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार असला तरी ग्राहकांच्या सोयीसाठी बँका त्यांच्या ऑनलाइन सेवांद्वारे सेवा सुरू असणार आहेत. यामुळे ग्राहकांच्या बँकिंग उलाढाली सुरू राहणार आहेत. तुमच्या शहारात सुरू असलेल्या बँकेच्या वेळेत तुम्ही तुमची कामं उरकू शकता.