मुंबई: नटरंग चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी या लावणीनं अनेकांची मन जिंकली होती. त्यानंतर आता ही लावणी खूप जवळपास सर्वत्र डान्ससाठी केली जात होती. एका रिक्षावाल्यानं ही लावणी भररस्त्यात केली आणि नागरिकांचीच नाही तर सोशल मीडियावर युझर्सची मनही जिंकली आहेत. 


रिक्षावाला डान्स व्हीडिओ बातमीत जोडला आहे, खाली पाहा


Baramati rickshawala dance video in this news


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रिक्षावाल्याच्या दिलखेच अदा पाहून युझर्सही लयभारी अशी प्रतिक्रिया देत आहेत. त्याचे हावभाव आणि त्याच्या अदांपुढे तर भलेभले गार पडतील असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. या रिक्षावाल्या तरुणानं मला जाऊ द्या ना घरी लावणीवर तुफान डान्स केला. त्याच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.



बारामतीच्या या रिक्षाचालकाचं नाव बाबजी कांबळे असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लावणीमध्ये अदा आणि हावभावाला खूप महत्त्व असतं. त्या अदा त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं केल्या आहेत की त्यांच्या व्हिडीओची देशभरात चर्चा होत आहे.