Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा निवडणुकीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात घमासान सुरु  झालं आहे. लोकसभा निवडणुकीवरुन बहिण – भावामध्ये संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अजित पवार हे सध्या बारामती मतदार संघातल्या प्रत्येत भागात जाऊन माझ्या विचाराच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन अजित पवार करत आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कुणी कुणाची पर्स सांभाळायला संसदेत जाणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली होती.  वडगाव भागातल्या सभेत बोलताना सुप्रिया सुळेंनी मी संसदेत गेल्यानंतर माझा नवरा माझी पर्स सांभाळण्यासाठी कँटिनमध्ये येत नाही, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना बारामती येथे एका सभेत अजित पवार यांनी थेट सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र डागलं आहे.


"काम करायचं असेल तर जो नगराध्यक्ष असेल त्याच्याशी नगरसेवकाला गोडच बोलावं लागतं. तरंच निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांकडून कामं करून घ्यायची असेल तर आमदाराने त्यांना सन्मान द्यावा लागतो. वाचाळवीर होऊन राजकारणात काम होत नाही. टीका-टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला संसदेत जाणार नाही. संसदेत जाऊन सारखं मोदी-शाह यांच्यावर टीका केल्यामुळं तुम्हाला कोण सांभाळून घेणार. संसदेत नुसती भाषणं करून चालत नाही, लोकांची कामही झालं पाहीजे," असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले.


काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?


"माझ्या खासदारकीवर माझं घर नाही चालत. कशाला चालायला पाहिजे. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे. नवऱ्याचं काय काम आहे इकडे. मॅडम, पार्लमेंटमध्ये नोटपॅड लागतो, पर्स नाही लागत. पर्समध्ये कुठे पैसे देणार आहोत. तिथे नोटपॅड, पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंटमध्ये जाता येतं. नवऱ्याला त्या परिसरात कुठेही परवानगी नसते. कॅण्टीनमध्ये बसा. मग तु्म्हाला कसा पाहिजे खासदार? जो तिथे बोलणारा पाहिजे की, नवरा बोलणारा पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? भाषण करतील. द्याल का मतं? कुणाकडे बघून मतं देणार मी की सदानंद सुळे? जाणार कोण तिथे मी. त्यामुळे विचार करून मतदान करा," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.