Uddhav Thackeray on Barsu Refinery Project : हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत. सर्वात आधी त्यांनी सोलगावमधल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधला. राख आम्हाला आणि रांगोळी तुम्हाला, असं चालणार नाही. प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प कोकणात नको, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Barsu Refinery Project LIVE Updates : प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध  - ठाकरे



बारसू रिफायनरीवरुन एकीकडे राजकीय शिमगा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे रिफायनरीविरोधक आणि समर्थकसुद्धा आमनेसामने उभे ठाकले आहेत. राजापूरच्या सोलगावमध्ये रिफायनरीविरोधक एकवटले होते. या आंदोलकांनी रिफायनरीला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे जवाहर चौकात रिफायनरी समर्थकांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. होय, मी रिफायनरी समर्थक अशा टोप्या काहींनी घातल्या होत्या.




रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. सोलगाव येथे ठाकरे संवाद साधल्यानंतर ते बारसूकडे रवाना झालेत. दरम्यान, बारसू प्रकल्पावरुन शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही, या शब्दांमध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राणे कुटुंबियांवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावरुन धमकी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणीही राऊत यांनी केली. ठाकरे यांना पाय ठेवू दिले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे बारसूच्या दौऱ्यावर आहेत. नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांना अडवून दाखवावं असं आव्हान वैभव नाईक यांनी राणेंना दिले आहे. उद्धव ठाकरे आज बारसूमध्ये येतायत म्हणून राणे आज मोर्चा काढणार आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी प्रकल्पग्रस्तांशी भेटून चर्चा करावी. मात्र, ते तसं करत नाहीत, कारण ते त्यांना हाकलून देतील, अशी टीका नाईकांनी राणे यांच्यावर केली आहे.


बारसू रिफायनरी ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात 


150 पोलीस अधिकारी, एक हजार 900 पोलीस कर्मचारी, SRPF तसsच रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्याही मागवण्यात आल्या आहेत. राजापूर शहरासहीत बारसू रिफायनरी ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, तसंच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा इथल्या पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे.


दीपक केसरकर यांची टीका


मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे बारसूमध्ये येऊन विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी जात आहेत. त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि मागण्या सांगितल्या तर विरोधासाठी विरोध होणार नाही. उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी बारसू येथे व्हावे हे पत्र देवून सुचवलं होतं. महाराष्ट्रातील इतिहासात पहिल्यांदाच स्वतः पत्र देऊन स्वतः विरोध करणे होत आहे. म्हणूनच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शरद पवारांनी आत्मचरित्रामध्ये व्यवस्थित लिहिले आहे. त्यामुळे त्यावर मी अधिक बोललो गरजेचं नाही, असे केसरकर म्हणाले.