यवतमाळ : खेळण्याच्य़ा नादात लहान मुलं स्वत:ला विसरुन जातात. आपण काय करतोय याचा अंदाज त्यांना नसतो. त्यांच्या अशा वागण्याने आई वडिलांना डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. अशीच एक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. खेळात मग्न असलेल्या चिमुकल्याने रिमोट बॅटरीचा सेल गिळल्याचा प्रकार समोर आलायं. हा सेल थेट त्याच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला.


रुग्णालयात दाखल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद राठोड असे चिमुकल्याचे नाव असून तो चार वर्षांचा आहे. आई वडिलांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी धावपळ करायला सुरूवात केली. 


चिमुकल्याचा नागपुरातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्यावस्थेत असलेल्या चिमुकल्यावर गॅट्रोइंट्रोलॉजीच्या डॉक्टरांनी उपचार केले.


डॉक्टरांचे आभार 


काही वेळातच हा चिमुकला धोक्यातून बाहेर असल्याचे डॉक्टरांनी त्याच्या पालकांना सांगितले. आपल्या मुलाला जीवदान मिळाल्याचे पाहून पालकांनी डॉक्टारांचे आभार मानले.


एन्डोस्कोपी मदतीनं प्रक्रियाकरून डॉक्टरांनी  आनंदच्या अन्ननलिकेतून ही बॅटरी सेल काढण्यात काढली.


पाल्याकडे लक्ष द्या 


हल्लीच्या धावपळीच्या जगात सर्वच आई-बाबा खूप व्यस्त झाले आहेत. कामाचा ताण, घरची काम, वैयक्तिक आयुष्य अशा अनेक जबाबदारीत बांधले गेलेयत.


अशावेळी आपल्या मुलांच्या हालचालीकडे वेळ देणं अनेकांना शक्य होत नाही. पण याकडे थोडेसेही दुर्लक्ष आयुष्यभरासाठी पस्तावणार असू शकतं. त्यामुळे आपली लहान मुलं काय करताहेत ? याकडे पालक म्हणून लक्ष ठेवणं गरजेच आहे.