मुंबई : वाहतूकीच्या नियमांच उल्लंघन करणे आता चांगलच महागात पडू शकतं.  वाहतूकीच्या नियम मोडताना पकडले गेल्यास तीन महिन्यांसाठी वाहन चालक परवाना रद्द केला जाऊ शकतो. वाढते अपघात आणि त्यात होणार्या मृत्युंच्या वाढत्या संखेला बघता महाराष्ट्र पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१५ ते २०१७ दरम्यान एकट्या महाराष्ट्रात एक लाख ३९ हजार अपघात झाले असून त्यात ३८ हजार नागरिकांचा बळी  तर १ लाख ७० हजार लोक जखमी झाले होते.


कार्डद्वारे सर्व माहिती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहन परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र हे मेट्रो आणि एटीएम कार्डसारखे नियरफील्ड कम्युनिकेशन असणार आहेत.


वाहतूक कोंडीसंदर्भात कोणतीही माहिती किंवा सूचना या नव्या कार्डद्वारे लवकर मिळू शकतील.


प्रदुषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहिती ही आरसी बुकमध्ये असणार आहे.


रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिलीय.