सोनू भिडे, नाशिक: 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना प्रकोपानंतर सध्या निसर्ग पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत विशेषता शंभर ते दीडशे किलोमीटरच्या अंतरात असलेल्या वर्षा पर्यटन स्थळांना जोरदार प्रतिसाद मिळतोय मात्र हे पर्यटन करण्यासाठी जाणार असाल तर सावध रहायला शिका . थोडेही गाफील राहिल्यास नुकसानीची जबाबदारी ही आपलीच असेल ...


शनिवार आणि रविवार वीकेंड म्हटला कि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. परिसरातील हॉटेल व्यवसाय या दिवसात तेजीत असतो. मात्र याच विकेंडला इगतपुरी तालुक्यात पर्यटन नगरीला काळिमा फासणाऱ्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटना एक :  स्थळ भावली धबधबा


भावली धरणाचा धबधबा आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मयूर देवळे यांचे कुटुंबीय शनिवारी (१० सप्टेंबर) सहलीसाठी आले होते.  आपली मारुती वॅगन आर कार धरणासमोरील मार्गालगत पार्क करत धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले. जातांना आपल्या गाडीत आपले मोबाईल सोन्याचे दागिने आणि इतर बहुमूल्य वस्तू  सुरक्षेसाठी ठेवल्या. धबधब्यात चिंब भिजल्यावर  आणि तुषारांचा आनंद घेतल्यानंतर कपडे बदलण्यासाठी देवळे गाडी जवळ गेले असता गाडीच्या खिडकीची काच फुटलेली त्यांना दिसली. गाडीत ठेवलेल्या वस्तू बघितल्या असता त्या चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. यात सोन्याचे दागिने आणि तीन मोबाईलचा समावेश होता.  याबाबत त्यांनी आजूबाजूच्या दुकानदारांना माहिती विचारली असता कुणीही काहीही सांगण्यास नकार झाला. अखेर कुठलाही तपास न लागल्याने इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  केली आहे.


घटना दोन : स्थळ रेन फॉरेस्ट रिसॉर्ट


इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट हॉटेलमध्ये मुंबई येथील प्रमोद लोखंडे, अनिल गायकवाड आणि शार्दुल परदेशी हे परिवारासह विकेंड साजरा करण्यासाठी आले होते. यातील एका महिलेच्या अंगावर रिसॉर्टमधील टाइल्स पडल्याने ती जखमी झाली होती. या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी पर्यटकांनी रविवारी हॉटेल व्यवस्थापक जैन यांना त्यांच्या कार्यालयात गाठले  मात्र  त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे. पर्यटकांनी हॉटेल व्यवस्थापका विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रेन फॉरेस्ट रिसॉर्ट हॉटेलमध्ये याअगोदर दुर्घटना घडली होती. यावेळी पर्यटकांना मदत केली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत ग्राहक न्यायालयात पिडीत कुटुंबीयांनी दाद मागितली असता रिसोर्टला जबाबदार धरत पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून १४ लाख रुपये देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले होते. मात्र पर्यटकासोबत झालेल्या वादाने हे हॉटेल पुन्हा चर्चेत आले आहे.


तिसरी घटना  हेदमबा धबधबा


नाशिक जिल्ह्यातील धबधब्याजवळ जाणारे पर्यटक हवामान विभागाचा इशारा असताना धबधब्याजवळ सहलीसाठी जात आहेत परिणामी नाशिकरोड येथील जेलरोड परिसरातील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे रविवारी आठ ते दहा युवक त्र्यंबकेश्वर तालुक्यात तोरंगण येथे हेदाम्बा परिसरातील धबधब्यावर गेले होते. दरम्यानच्या काळात पावसाचे प्रमाण वाढल्याने नदीचे पाणी वाढले. त्यात 25 वर्षीय शुभम चव्हाण हा युवक नदीच्या वाढत्या प्रवाहात वाहुन गेलाये. तो कुठे अडकला आहे हे कळण्यास मार्ग नसल्याने. नाशिकच्या रेस्क्यू टीमने अंधार पडल्यामुळे रेस्क्यू मोहीम थांबवन्यात आले होते ,सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली ..अखेर शोधांअती  शुभम मासलोंढी डोहापासून सरासरी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वाहून गेले होता तो  मृत अवस्थेत सापडलाय


पर्यटकांनी केली मागणी


पावसाळ्यांत राज्यात पर्यटनस्थळी मोठी गर्दी बघायला मिळते. यात लहान मुलांपासून वृद्ध सुद्धा याचा आनंद घेत असतात. मात्र पर्यटन स्थळी महिलांच्या आणि वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था नाही. स्थानिक नागरिक याचा गैरफायदा घेत असतात. पर्यटकांना दमदाटी तसेच शिवीगाळ करून मारहाण करून पर्यटकांना लुटले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पर्यटन नगरीत पोलिसांनी विशेष मोहीम राबवण्याची मागणी यावेळी पर्यटकांनी केली आहे.