गोंदियात अस्वलाच्या हल्यात एक ठार, तीन जखमी
शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर अस्वलाने चढवलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.
गोंदिया : शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर अस्वलाने चढवलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.
गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटखेडा गावातील ही घटना आहे. शेतामध्ये काम करत असताना केशव झिलपे या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला चढवला आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू ओढवला आहे.
जखमींमध्ये महादेव लोनारे, शंकर भागडकर आणि एका मुलांचा समावेश आहे. हल्ल्यातील जखमींवर नागपूर येथे उपचार सुरु आहे.