बापाने अल्पवयीन मुलीचं बळजबरीने लग्न ठरवलं, कारण ऐकूण तुमचीही तळपायाची आग मस्तकात जाईल
अल्पवयीन असतानाही लग्न करायचे नसताना तिच्या मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे.
पुणे : हडपसरमधील साडेसतरानळी येथील एका 14 वर्षाच्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन असतानाही लग्न करायचे नसताना तिच्या मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे.
मात्र, या प्रकरणामागील खरं कारण तिने सांगितले ते ऐकून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहाणार नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीची आई घरी नसताना पीडित मुलीचे वडिल तिला वेळोवेळी शारीरीक स्पर्श करुन छळ करीत असत. 18 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान हे प्रकार वारंवार घडले.
पीडित मुलीची आई घरी नसल्याचा फायदा घेत वडिलांनी फेब्रुवारीमध्ये जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध केले. त्यानंतर त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. 3 मार्च रोजी त्याने पुन्हा असा प्रकार केला.
पीडित मुलीने या प्रकाराची माहिती आईला सांगितली. आईने वडिलांना जाब विचारला. तेव्हा त्याने बायकोला मारहाण केली तसेच याबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
झाल्याप्रकारानंतर आरोपीने पीडित मुलीला लग्न करायचे नसतानाही तिच्या मनाविरुद्ध लग्न ठरवले. यामुळे संताप अनावर झालेल्या मुलीने आपल्या वडिलांविरोधात फिर्याद दाखल केली. त्या नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.