औरंगाबाद : देशभरात सध्या चर्चेत असलेल्या जिहादी धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन उघड झालंय. यूपी पोलिसांनी याप्रकरणी बीडमधल्या तरुणाला अटक केलीय... एवढंच नव्हे तर धर्मांतरासाठी कोड वर्डचा वापर कसा केला जात होता, त्याचा गौप्यस्फोटही पोलिसांनी केलाय.


जिहादी धर्मांतरासाठी कोड वर्डचा वापर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातल्या धर्मांतर रॅकेट प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक माहिती उजेडात येतेय. मूक-बधीर व्यक्तींना धर्मांतर करायला भाग पाडणारे आरोपी सात वेगवेगवळ्या कोडवर्डचा वापर करत होते... उत्तर प्रदेशचे गृह सचिव अवनीश अवस्थी यांनी या कोडवर्डच्या नेमक्या अर्थाचा गौप्यस्फोट केलाय.


कोड वर्डचा नेमका अर्थ काय?


रिवर्ट बॅक टू इस्लाम प्रोग्राम - म्हणजे धर्म परिवर्तन करणे
मुतक्की - म्हणजे हक्क आणि सत्याचा शोध
रहमत - म्हणजे विदेशातून मिळणारा फंड
सलात - म्हणजे नमाज
अल्लाह के बंदे - म्हणजे सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ दाखवणारे
मोबाईल नंबर, 
जन्मतिथी - म्हणजे धर्मांतर केल्यानंतरचं नाव
असे कोडवर्ड वापरले जात होते...
त्याशिवाय कौम का कलंक नावाचा आणखी एक कोडवर्ड ते वापरत होते. मात्र त्याचा नेमका अर्थ काय याचा उलगडा होऊ शकलेला नाही..


बेकायदा धर्मांतरासाठी देश-विदेशातून सुमारे 1 कोटी रुपयांहून जास्त रक्कम हवालामार्फत आल्याची माहितीही पोलीस तपासात उघड झालीय...


दरम्यान, या धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शनही उघड झालंय... यूपी एटीएसनं ज्या तिघांना अटक केली, त्यापैकी


इरफान नावाचा आरोपी हा बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावचा मूळ रहिवाशी आहे.
दिल्लीतल्या मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअर मध्ये इंटरप्रिटर म्हणून तो काम करतो.
अहमदाबादच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इरफानचं खास कौतुकही केलं होतं.


त्यामुळं इरफानच्या नातेवाईकांनी त्याच्यावरील आरोप फेटाळून लावलेत. 


जिहादच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा धर्मांतरासाठी उच्चशिक्षित तरुणांचा कसा वापर होतोय, ते देखील या बीड कनेक्शनमुळं उघड होतंय...