बीड : अखेर कुंडलिक खांडे यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलिक खांडे यांना पदावरून बाजूला केल्यानंतर शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. बेकायदेशीर गुटका साठवणूक प्रकरण शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना भोवले आहे. (Beed district chief Kundlik Khande was removed from the post by Shiv Sena)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खांडेवर पक्षाने कारवाई केल्याची बातमी थेट शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्रात छापून आली. त्यानंतर जिल्हातील शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. आणि मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. 


बेकायदेशीर गुटका साठवणूक प्रकरण शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना भोवल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसापूर्वी गुटखा प्रकरणात खांडे यांच्यावर प्रमुख आरोपी म्हणून गुन्हा नोंद झाल्यानंतर पक्ष प्रमुखांनी कारवाई केली आहे. आता बीडमध्ये सेनेच्या नवीन जिल्हा प्रमुखपदासाठी अनिल जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. नवे जिल्हा प्रमुख कोण असणार याची उत्सुकता आहे.