बीड : पुष्पा सिनेमाची भुरळ तर जगभरातील लोकांवर पडली आहे. केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर सोशल मीडियावर पुष्पाची धूम पाहायला मिळत आहे. पुष्पा सिनेमाची भुरळ राजकीय नेत्यांनाही पडली आहे. सोशल मीडियावर रिल्सचा पाऊस पडत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुष्पा सिनेमाची भुरळ बीडच्या आमदारालाही पडली आहे. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा चित्रपटातील डायलॉग सध्या सुपर हिट झाले आहे. 



आता याच डायलॉग ची भुरळ राजकीय पुढार्‍यांना देखील पडलेली दिसते. बीडमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीसागर यांनी ऐ... मै, झुकेगा नही.... असा डायलॉग मारला. त्यानंतर समोर बसलेल्या लोकांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला. सध्या याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.


याआधी धनंजय मुंडे यांचा लग्नातील डान्स तुफान चर्चेत आला होता. त्यानंतर आता पुष्पाचा हा डायलॉग सध्या चर्चेत आहे.