विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड :  जिल्ह्याचे भाजप (BJP) शहराध्यक्ष भगीरथ बियाणी (Bhagirath Biyani) यांनी राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केलीय. घरच्यांनी कळताच त्यांनी बियाणी यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती कळताच खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) घटनास्थळी झाल्या. बियाणी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र या घटनेनंतर बीड शहरात एकच खळबळ माजली आहे. रुग्णालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगीरथ बियाणी दुपारी आपल्या खोलीत असताना गोळी झाडल्याचा आवाज आला. गोळीचा आवाज ऐकून घरातल्यांनी तात्काळ त्यांच्या खोलीकडे धाव घेतली. खोलीत जाऊन पाहिलं असता भगीरथ बियाणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ह दृश्य पाहून घरच्यांनी आरडाओरडा सुरु केला. बातमी कळताच शेजारच्यांनी आणि भाजप समर्थकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. भगीरथ बियाणी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. 


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बियाणी यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्या कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही. खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयात पोहोतच कार्यकर्ते आणि पोलिसांकडून माहिती घेतली.