विष्णु बुरगे, झी मीडिया बीड : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना आमदारकीची संधी हुकली. मात्र आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार (Shine-Fadancis Government) आल्यानंतर पंकजा मुंडे यांना मंत्री पद मिळावं यासाठी कार्यकर्ते आग्रह आहेत. आज बीड जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्या आणि पंकजा मुंडे यांच्या महिला समर्थकांनी बीड ते मोहटा देवी पायी दिंडी काढत पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावा यासाठी साकड घातलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वेळा भाजपकडून आमदारकीसाठी हुलकावणी मिळाली असली तरी पंकजा मुंडे यांना जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपद मिळावं यासाठी महिला कार्यकर्त्यांनी ही पायी दिंडी काढली. पंकजा मुंडे यांना मंत्री पद मिळेल अशी अपेक्षा महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 


2019 विधानसभा निवडणुकीत पराभव
2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा परळीमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. खर तर या परभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र त्यानंतर अनेक वेळा पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात आलं. 


ज्यावेळी विधान परिषदेवर जागा रिक्त होतात त्या प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवावं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येतं. प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येत खरं मात्र त्यांना हुलकावणीच मिळते.


मुंडे समर्थकांना संधी
कधीकाळी गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असलेले भागवत कराड यांना खासदारकी देण्यात आली, आणि त्या पाठोपाठ यांना मंत्रिपदी देण्यात आलं. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असलेले रमेश कराड यांना देखील विधान परिषदेवरती संधी देण्यात आली, तसंच त्यांना लातूर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद देखील देण्यात आला. 


पंकजा मुंडे यांना मात्र वेळोवेळी डावललं जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक वेळा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. ज्यावेळी भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रीपदाची घोषणा झाली, त्यावेळी जिल्ह्यामध्ये उघडपणे  राजीनामा नाट्य देखील रंगलं. काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे बीड जिल्हा दौऱ्यावर आला असताना प्रत्येक वेळी कार्यकर्ते मागणी करतात आणि त्याचा त्रास मला होतो असं देखील म्हटलं होतं.


आता शिंदे गट आणि भाजपचं राज्यामध्ये सरकार आलंय आणि पुन्हा समर्थक महिला आणि भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी मागणी केली आहे. आज त्यासाठी त्यांनी चक्क बीड ते मोहटा देवी पायी दिंडी काढत मोहटा देवीकडे पंकजा मुंडे यांना मंत्री पद मिळावं यासाठी साकडं घालणार असल्याचं सांगितलं.