Walmik Karad Audio Clip:  बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची (Walmik Karad) आणखी एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल झाली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला असून सध्या पोलीस कोठडीत आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड प्रकरण मिटवण्यासाठी सायबर पोलिसांवर दबाव टाकत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे पोलीसही त्याला फारसा विरोध करताना दिसत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी आरोपींना वाल्मिकचा पाठिंबा तर सायबर पोलिसांवर दबाव टाकल्याची कथित ऑडिओ क्लीप समोर आली आहे. व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एक कार्यकर्ता वाल्मिक कराडला फोन करुन पोलीस आपल्याला सतत फोन करत असल्याचं सांगतो. यानंतर वाल्मिक कराड सायबर पोलिसातील महिला अधिकारी निशिगंधा खुळे यांना फोन करुन प्रकरण मिटवण्यास सांगतो. हे बोलणं झाल्यावर वाल्मिक कराड संबंधित कार्यकर्त्याला 'फार मनावर घ्यायचं नाही, तुमचा बार इथे बसलाय' असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. 


ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण आहे?


कार्यकर्ता - अण्णा नाशिकमधून बोलतोय. मला पोलीस स्टेशनमधून पुन्हा फोन येऊ लागले आहेत
वाल्मिक कराड - कोणाचा फोन आला होता, त्यांचा नंबर टाकता का
कार्यकर्ता - पीएसआय कुलथे
वाल्मिक कराड - मला नंबर द्या
वाल्मिक कराड - ताई वाल्मिक कराड बोलतोय, ती चिल्लर पोरं आहे, ती काय करणार आहे
निशिगंधा खुळे, सायबर पोलीस - पोस्ट डिलीट केली तर झालं अण्णा, आणखी काय हवं
वाल्मिक कराड - पोस्ट डिलीट करुन टाका
कार्यकर्ता - हो करतो अण्णा
निशिगंधा खुळे - वातावरण खराब होतं, सगळ्यांचेच फोन सुरु होते
वाल्मिक कराड - आम्ही शांत होतो, त्यांनीच सुरुवात केली. अरेला कारे होतं
वाल्मिक कराड कार्यकर्त्यांना उद्देशून - एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलो आहे आपण
कार्यकर्ता - तुम्ही आहात म्हणूनच दम धरला आहे


दरम्यान, वाल्मिक कराड सध्या मकोका गुन्ह्यांतर्गत एसआायटीच्या कोठडीत आहे. आजारी असल्याने त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज देत पुन्हा कारागृहात पाठवण्यात आलं आहे. तर, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र, तो अद्यापही फरार असल्याने त्याची हत्या तर झाली नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.