COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विष्णू बुरगे, झी २४ तास, बीड : अनेक विनाअनुदानित शिक्षक मागील दहा ते बारा वर्षापासून अनुदान मिळेल आणि आपल्याला पगार सुरू होईल या अपेक्षेने अध्यापनाचं काम करत आहेत. मात्र अद्यापही विनाअनुदानित शाळांना आणि शिक्षकांना पगार मिळत नाहीये. मात्र पगार मिळत नसला तरीही दुसरं काम करुन काही शिक्षक आपलं घर चालवत निष्ठने ज्ञानदानाचे काम करताना दिसतायत. 


प्रतिभा आरसुळ या मागील दहा वर्षापासून खासगी शाळेवर ज्ञानदानाचे काम करतात. या शाळेमध्ये खेळ शिकवण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे.  त्यांचे अनेक विद्यार्थी जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन विजय झालेली आहे तर मागील दहा वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी डॉक्टर्स इंजिनिअर्स आशा मोठ्या पदावर ती काम करत आहेत. असं असलं तरी अजूनही त्या आपल्याला पगार मिळेल या प्रतीक्षेत आजही आहेत. 


सरकारी नोकरी मिळेल या अपेक्षेने त्यांनी २०१० ला खाजगी संस्थेमध्ये शिकवणी सुरू केली. तब्बल दहा वर्षांपासून प्रतिभा या विना पगार काम करतात. मात्र त्यांचा संकल्प अजूनही सुटलेला नाही. एवढंच नाही तर त्यांनी विनाआनुदानित शिक्षकाणी उभरलेल्या शेकडो आंदोलनात सहभाग घेतला व स्वत: अनेक आंदोलन केली. लातूर मुंबई ओरंगाबाद अस कुठलच आंदोलन त्यांनी सोडल नाही. हा संघर्ष संपावा ही एकच इच्छा त्यांच्या मनात आहे.



कोरोनाच्या संकटांमध्ये ही त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडत आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना आजही धडे देतात पगार नाही म्हणून शिकवायचं नाही असं कधीही त्यांना वाटलं नाही मात्र सरकारने यांच्यासह अनेक विनाअनुदानित शिक्षण कडे दुर्लक्ष केलं परिणामी आज त्यांची हलाखीची परिस्थिती असूनही त्यांनी ज्ञानदान सोडलं नाही.


अनुदान नसल्यामुळे पगार नाही मग घर चालवण्यासाठी काहीतरी करायचं म्हणून प्रतिभा यांनी फिटनेस क्लास सुरू केले. चांगली सुरुवात ही झाली मात्र अचानक आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना फिटनेस क्लास ही बंद करावे लागले,  पण खचून न जाता पुढे अविरतपणे ज्ञानदान करू असा आत्मविश्वास दाखवत आहेत


प्रतिभा यांनी आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर करून अनेक विद्यार्थी घडवले पगार मिळत नाही म्हणून कधीही कंटाळा केला नाही. ज्ञानदानाची त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे.