बेळगावात २ गटात तुफान दगडफेक
या घटनेत पोलीस आयुक्तांसह काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे.
बेळगाव : बेळगावच्या खडकगल्ली परिसरात दोन गटात तुफान दगडफेक झाली. बुधवारी रात्री दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. या घटनेत पोलीस आयुक्तांसह काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे.
दगडफेकीचं कारण अस्पष्ट
कोणत्या कारणामुळे ही दगडफेक झाली, याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी इथं तात्काळ धाव घेतली. यावेळी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचाही वापर करावा लागला.
स्थानिक नागरिकांमध्ये भीती
या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद आजूबाजूच्या परिसरातही पसरले. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं.
खबरदारीचा उपाय म्हणून वीज खंडीत
खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी काही काळ इथला वीजपुरवठा काही काळ खंडीत करण्यात आला होता. ऐन अधिवेशन काळात समाजकंटकांकडून ही दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. हे समाजकंटक बाहेरुन आल्याचं बोललं जातं आहे.