Bhagat Singh Koshyari: `मला धमकी दिली होती` कोश्यारींचा गौप्यस्फोट, तर अजितदादा म्हणतात...
Bhagat Singh Koshyari: अजूनही 12 आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नाही. अशातच त्यावेळी कोश्यारींना सही का केली नाही? यावर स्पष्टीकरणं दिलंय.
Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor of Maharashtra) म्हणून आपला कार्यकाळ संपलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीने (Bhagat Singh Koshyari) नेहमी राजकीय वर्तुळात चर्चेत राहिले. सध्या ते हेडराडूनला गेले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात सर्वात चमत्कारीक क्षण राहिला तो पहाटेचा शपथविधी. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांचा झालेला पहाटेचा शपथविधी (Morning oath). त्यामुळे कोश्यारी नेहमी ट्रोल होत हेोते. अशातच आता कोश्यारी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ज्यावेळी मुख्यमंत्री होते, तेव्हा महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त 12 जागांसाठी नावं पाठवली होती. मात्र, कोश्यांरींनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या नावांना मंजुरी दिली नाही. ते आता जबाबदारीतून मुक्त झाले असले तरी अद्याप त्या 12 आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नाही. अशातच त्यावेळी कोश्यारींना सही का केली नाही? यावर स्पष्टीकरणं दिलंय.
काय म्हणाले Bhagat Singh Koshyari?
महाविकास आघाडीच्या नेते येत होते. त्यांनी मला 12 आमदारांच्या फाईलवर सही करण्यासाठी धमकी दिली होती. पुढच्या 15 दिवसांत फाईलवर सही करा, असा अल्टीमेटम त्यांनी मला दिला होता. जे राज्यपालपदाच्या गरिमेला शोभणारं नव्हतं. मुख्यमंत्रिपदावर बसलेला व्यक्ती असे निर्देश देऊ शकतो काय? असा सवाल कोश्यारींनी यावेळी उपस्थित केलाय.
आणखी वाचा - Eknath Shinde : आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?
दरम्यान, माझा कोणत्याच नावावर आक्षेप नव्हता. माझा आक्षेप होता पत्रातील भाषेवर. राज्यपाल तुमचा नोकर नाही, तुम्ही सांगाल ते काम करेल. राज्यपालांना कोणतेच मुख्यमंत्री देऊ शकत नाही. मी संविधानानुसारच काम केलं, असं स्पष्टीकरण कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी यावेळी दिलं आहे.
अजित पवार म्हणतात...
भगतसिंह कोश्यारींना धमकी दिली असेल तर ते पत्र रेकॉर्डवर असेल, ते पत्र त्यांनी सर्वांसमोर आणावं. मिडीयाला द्यावं, जनतेला सांगावं, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. ते सध्या कोणत्याही पदावर नाही. त्यामुळे ती त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यास बांधिल नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.