Dharmarao Baba Atram Vs Bhagyashree Atram : गडचिरोची जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालंय.. कारण धर्मरावबाब आत्राम यांची कन्या  भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.. भाग्यश्री आत्राम शिवस्वराज यात्रेत सहभागी झाल्यात होत्या.. अहेरी विधानसभा क्षेत्रात निवडणुकांच्या तोंडावर आत्राम घरात या पक्षप्रवेशामुळे उभी फूट पडलीय... त्यामुळे अहेरी विधानसभेत बाप विरुद्ध लेक असा सामना रंगण्याची शक्यता आहे.. शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर  भाग्यश्री आत्राम यांनी थेट बापालाच धमकी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. पक्षप्रवेशानंतर भाग्यश्री आत्राम चांगल्याच आक्रमक झाल्यात.. धर्मरावबाबा शेर तर मी शेरनी आहे.. माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकणार, असा गंभीर इशारा भाग्यश्री आत्रामांनी धर्मरावबाबांना दिला आहे.


भाग्यश्री आत्राम यांच्या शरद पवार पक्षात प्रवेशाची घोषणा होताच, त्या सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पहायला मिळाले होते. 9 सप्टेंबर रोजी भाग्यश्री आत्राम थेट गडचिरोलीतील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावाने भरपूर निधी देता आणि दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं नाही...फक्त निवडणूक जिंकण्यापुरतीच लाडकी बहीण योजना आहे का? अशा शब्दांत भाग्यश्री आत्राम यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. 


अजित पवार यांनी दिला होता इशारा


वस्तादने एक डाव राखून ठेवलाय..तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका...असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गडचिरोलीत अत्रामांच्या मुलीला इशारा दिला होता. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट देण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी इशारा दिला होता.