मुंबई : प्रकाशमय असलेल्या या दिवाळीच्या सणात एक दिवस भाऊबीजेचा असतो. हा दिवस बहिण-भावाच्या प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवाळीचा आजचा पाचवा दिवस. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या सुखी, समृद्धी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक मासच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीवर भाऊबीज हा सण आला आहे. या दिवशी भावाला औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. दुपारी 1 वाजून 11 मिनिटे ते 3 वाजून 23 मिनिटे हा शुभ मुहूर्त असणार आहे. 


भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्व निर्माण होते त्यामुळे या दिवशी बहिणरूपी स्त्रीच्या सानिध्यात राहिल्याने, तिने बनवलेले पदार्थ खाल्ल्याने भावाला लाभ होतात, असे म्हटले जाते. 


भाऊबीज शुभ मुहूर्त


तिथी: 29 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 6. 13 पासून ते 30 ऑक्टोबर सकाळी 3.48 मिनिटांपर्यंत


भाऊबीज ओवाळणी मुहूर्त: 1 वाजून 11 मिनिटांपासून ते 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत


भाऊबीजेची कथा 


सूर्यदेव आणि छाया यांच्या मुलांवर म्हणजे यमराज आणि यमुना यांच्यावर आधारित ही कथा आहे. यमुना कायमच आपल्या भावाला यमराजला घरी येऊन जेवणाचा आग्रह करत असे. मात्र, यमराज व्यस्त असल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हते. आणि ते यमुनाची गोष्ट टाळत असतं. 


मात्र एक दिवस कार्तिक मासातील शुक्ल द्वितीयेला भाऊ यमराजच्या आपल्या दाराशी पाहून यमुना थक्क होते. प्रसन्न चेहऱ्याने स्वागत करते आणि भोजन करते. यावेळी यमराज प्रसन्न होऊन बहीण यमुनेला वरदान मागण्याची विनंती करतात. यावेळी यमुना वर मागते की, आपण दरवर्षी माझ्याकडे स्नेहभोजनाला यावे. आणि या दिवशी बहीण भावाला औक्षण करेल त्याला कोणतेच भय नसेल.