Bhalchandra Nemade: साठोत्तरी काळातील दिग्गज कवी, कादंबरीकार, समीक्षक, भाषाभ्यासक अशी ओळख असलेले भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) आपल्या रोखठोक आणि स्वतंत्र वैचारिक क्षैलीसाठी ओळखले जातात. भालचंद्र नेमाडे यांनी अगदी सहजतेने आपल्या साहित्यविषयक भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. अशातच आता नेमाडे (Novelist Bhalchandra Nemade) यांनी राजकीय परिस्थितीवर नेमाडे यांनी मत स्पष्टपणे मांडलं आहे. (bhalchandra nemade angry On Maharastra Politics Jalgoan marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावातील (Jalgoan News) जैन हिल्स येथील जैन समूहाच्या वतीने साहित्यिकांसाठी साहित्य कला पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भालचंद्र नेमाडे यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली होती. सोहळ्यानंतर नेमाडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.


चांगल्या लोकांनी राजकारणात (Maharastra Politics) पडूच नये हे असं सुरू आहे. कुठला चांगलं माणूस धजेल यात?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खोक्यांची भाषा चालते का? आपल्या सारख्याला शक्य नाही, असं वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी यावेळी केलंय. आपण हरामxx लोकांना निवडून देतो. त्याचं हे फळं आहेत. आपल्याला कळत नाही का कोण चांगलं आहे ते?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.


आणखी वाचा - Belgaum: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना जे जमलं नाही ते पवारांनी करुन दाखवलं; गनिमी काव्यानं बेळगावात गेले अन्...


दरम्यान, अनेकांना सगळ्या गोष्टी मिळत नाही. फार तर 10 ते 15 टक्के लोकांचं नीट चाललंय. अशा लोकांनी कुणाला निवडून द्यावं, हे तर कळलं पाहिजे. लोकशाहीचा काय उपयोग आहे ?, असा सवाल नेमाडे (Bhalchandra Nemade On Maharastra Politics) यांनी सर्वसामान्य लोकांना विचारला आहे. नेमाडे यांचं वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.