Bhandara Accident : भंडाऱ्यातून (Bhandara News) अपघाताची बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यात चारचाकी वाहनाची आणि बसची समोरासमोर धडक बसल्याने मोठा अपघात घडला आहे. साकोलीकडून लाखनीकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाला तुमसरकडे (Tumsar) जाणाऱ्या बसची समोरासमोर धडक बसली. ही घटना भंडारा जिल्ह्याचा साकोली तालुक्यातील कीन्ही येथे घडली. या अपघातात बस मधील 26 प्रवासी सुखरूपपणे बचावले असून चारचाकी वाहनातील दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघातात कारचे मोठं नुकसान झालं आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू 


अकोला - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात वाशिमच्या तामसाळा फाट्याजवळ झाला आहे. एमएच 38एल2807 या क्रमांकाची दुचाकी घेऊन दोघे जण वाशिमवरून हिंगोलीकडे चुकीच्या बाजून जात होते. त्यावेळी समोर येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. यात एक जण ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतकाची ओळख पटली नसून जखमीवर वाशिम येथे उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.


मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात


रंग घेवून मोताळा गाव येथे जात असलेल्या रिक्षाला मागून भरधााव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर घडली. धडक इतकी जोरात होती की पुढे चालणारी रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर या जागीच ठार झाल्या. तर त्यांच्यासोबत असलेले चार प्रवासी गंभीर जखमी झाले. जळगावकडून प्रवासी रिक्षातून प्रवासी रंग घेवून भुसावळकडे जात असताना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.