COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा : सत्ताधाऱ्यांकडून प्रतिष्ठेची केलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज (सोमवार, २८ मे) मतदान पार पडत आहे. या मतदानाची वेळ आर्धा तासाने वाढवून संध्याकाळी साडे सहापर्यंत करण्यात आली आहे. यापूर्वी ही वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ अशी होती. एकुण १७ लाख ५९ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २१४९ मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून, यासाठी ४७२८ बॅलेट युनिट, २३६६ कंट्रोल युनिट व २७२४ व्हिव्हिपॅट वापरले जाणार आहेत. लोकसभा पोट निवडणुकीसाठी प्रथमच व्हिव्हिपॅट वापरण्यात येणार असल्याने मतदारांमध्ये व्हिव्हिपॅट विषयी उत्सुकता असणार आहे. मतदान शांततेत पार पडावं यासाठी निवडणूक आयोगानं कंबर कसलीय.


पालघरमध्येही लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू


अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज ७ वाजलेपासून  मतदानाला सुरुवात झाली. पालघर लोकसभेत एकूण २०९७ मतदान केंद्र असून, ईव्हीएम मशीन सोबत vvpad चा वापरही होणार आहे. मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडावे यासाठी १२ हजार ८९४ कर्मचारी तसेच, चार हजार २१९ सुरक्षा कर्मचारी कार्यरत राहणार असून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.