प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : परस्पर भांडणातून भाच्याने मामाची हत्या (nephew killed uncle) केल्याचा धक्का प्रकार भंडाऱ्यात (bhandra cirme news) घडलाय. हत्येनंतर आरोपीने काहीच झाले नाही असे दाखवले. मात्र पोलिसांनी (Bhandara Police) अधिक तपास करत आरोपी भाच्याचे बिंग फोडले आहे. दोघेही विटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते. परस्पर झालेल्या वादातून आरोपी भाच्याने मामाचा फावड्याने वार करुन हत्या केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडाऱ्यातील कारधा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या अजीमाबाद येथे ही धक्कादायक घटना घडवी आहे. राजू मनहारे (33) असे मृत मामाचे नाव आहे. तर, सुनीलकुमार छत्तु गितलहरे (18) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. दोघेही मूळचे छत्तीसगढमधील बलोदाबाजार जिल्ह्यातील सलोनी येथील रहिवासी आहेत. दोघेही कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिमाबाद गावात विटभट्टीवर कामाला होते. तन्नू पटेल यांची ही विटभट्टी होती. हे दोघेही भट्टी परिसरातच अन्य कामगारांसह एका झोपडीत राहत होते.


रविवारी भांडणानंतर सुनीलकुमारने मामा राजू मनहारे याची फावड्याने हत्या केली. त्यानंतर राजू मनहारे याचा मृतदेह विटभट्टीच्या खड्डात आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थाळी धाव घेतली. मात्र मृतेदह रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी भाच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीमध्ये भाचा सुनीलकुमारने मामाच्या हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत सुनीलकुमारला अटक केली आहे. तसेच राजूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत.


नेमकं काय झालं?


रविवारी सुनीलकुमार आणि राजूने भट्टीच्या मालकाकडून पगार घेऊन रात्री जेवणासाठी मासे आणले होते. त्यानंतर दोघांनीही दारु प्यायली. यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु झाले. या भांडणाचे रुपांतर वादात होऊन दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. यावेळी सुनीलकुमारने राजूला जबर मारहाण केली. सुनीलकुमारने फावड्याने राजूवर हल्ला करत त्याला रक्तबंबाळ केले. जीव वाचवण्यासाठी राजूने तिथून पळ काढला. मात्र विटांसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात राजू पडला. खड्ड्यामध्ये चिखल असल्याने राजू याला बाहेर पडता आले नाही आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला.