मुंबई / ठाणे : भारत बंदला ( Bharat Bandh) राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन (Chakka Jam agitation inThane)  करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर झोपून आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. नागपुरात प्रसिद्ध संत्रा मार्केटमधील व्यवहार सुरु आहेत. मात्र दररोज २००-३०० गाड्या येतात. त्याठिकाणी आज ५० गाड्या आल्यायत. ग्राहकही १५ ते २० टक्केच दिसून येत आहेत.


Bharat Bandh LIVE : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशवंत माल असल्यानं विक्रीसाठी आणल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई - अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली. पुण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येतोय. फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त १७४ गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली आहे. कोल्हापुरात देखील भारत बंदला सकाळच्या सत्रामध्ये समिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. तर पंढरपूरमधल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत बाजार समिती बंद ठेवली आहे.


दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला रायगड जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आज सकाळपासून हॉटेल्स , भाजीविक्रेते स्टॉल व इतर सर्व प्रकारची दुकाने उघडली आहेत . शेतकरी कामगार पक्षाचा गड असलेल्या अलिबाग शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले . जिल्ह्याच्या अन्य भागातही बंदला फारसा प्रतिसाद नाही. लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेले व्यावसायिक बंदला प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेत नाहीत , असं चित्र आहे . एसटी वाहतूक सुरू असली तरी काही ठिकाणी अडकून पडण्याची भीती असल्याने एसटीला कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.