Bharat Gogavale: रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेना ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. मी मंत्री होणार हे ठाम विश्वासाने सांगणारे आमदार भरत गोगावले मंत्री झाले. दरम्यान आता त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दावा केलाय. इथल्या पालकमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही. मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार, असा दावा भरत गोगावले यांनी केला. शिवसेनेचे रायगड जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्री आमचाच होणार असे स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेने दावा केलाय. मंत्री भरत गोगावले त्यासाठी आग्रही आहेत. आज रायगड जिल्ह्याच्या वेशीवर कळंबोली इथ भरत गोगावले यांचे जोरदार स्वागत झाले त्यावेळी त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पालकमंत्री पद आपल्यालाच मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. यापूर्वीही पालकमंत्री पद शिवसेनेकडेच होतं. आणि आता तर मी मंत्री आहे आणि जिल्ह्यात आमचे तीन मंत्री आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदावर आमचाच दावा असल्याचं गोगावले यांनी ठासून सांगितलं. रायगडच्या पालक मंत्री पदावरून कुठलीही रस्सीखेच नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले.  कळंबोली नाका इथं गोगावले यांच्या स्वागतासाठी शिवसेना पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी 10 जेसीबीमधून गोगावले यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांच्यासाठी भलामोठा हार आणण्यात आला होता. मंत्री झाल्यानंतर भरत गोगावले यांचे पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात आगमन झाले. महाड मतदार संघाला 20 वर्षानंतर प्रथमच मंत्रीपद मिळाले. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिकांनी ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.