Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) उद्या महाराष्ट्रातील (Maharashtra) शेवटचा दिवस आहे. आज शेगावमध्ये (Shegaon) या यात्रेतील शेवटचं भाषण त्यांनी केलं. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. सत्तर दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रा सुरु झाली, दररोज 25 किमी यात्रा पुढे जाते, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, आंध्रा आणि आता महाराष्ट्र, विरोधी पक्षांनी प्रश्न विचारला होता यात्रेचा फायदा काय होणार आहे. देशातल्या काना-कोपऱ्यात भाजपने द्वेष आणि हिंसा पसरवली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात सध्यात भीतीचं वातावरण
देशात सध्या भीतीचं वातावरण आहे. या द्वेषआणि हिंसेविरोधात ही यात्रा आहे. यात्रेचं उद्देश सामान्या माणसाचा आवाज ऐकण्यासाठी आहे, सामान्य माणसाचं दु:खं जाणून घेण्यासाठी आहे. भीती, द्वेष आणि हिसेंमुळे विभाजन होतं, पण प्रेमामुळे लोकं जोडली जातात. द्वेषातून या देशाचा कधीच फायदा होणार नाही, असं राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.


शेतीमालाला भाव नाही, तरुणांना नोकरी नाही
भारत जोडो यात्रेचा फायदा काय असा प्रश्न विरोधक उपस्थित करतायत  पण जेव्हा ते या रस्त्यांवरुन चालतील तेव्हा त्यांना वास्तव कळेल. या राज्यात गेल्या सहा महिन्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. का केली आहे? शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाहीए, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, पण त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, अनेक शेतकरी आम्हाला विचारयात, आमची चूक काय होती? ही भीती नाही तर काय आहे असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.


हे ही वाचा : Bharat Jodo Yatra : गांधी-नेहरु घराणं एकत्र, तुषार गांधींकडून राहूल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन


असा हिंदुस्तान आम्हाला अभिप्रेत नाही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान प्रेमाने शेतकऱ्यांचा आवाज ऐकतील तर राज्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. मनापासून जर शेतकऱ्यांच्या भावना ऐकल्या तर हा प्रश्न सुटेल. अनेक तरुणांना रोजगार मिळत नाहीए. उच्च शिक्षण घेतलेले तरुण ओला-उबेर चालवतायत, मजूरी करतायत, हा देश आम्हाला अभिप्रेत होता का? असा हिंदुस्थान आम्हाला नकोय, दोन-तीन उद्योगपती देशाची सर्व संपत्ती घेऊन जातायत, असा हिंदुस्थान आम्ही होऊ देणार नाही. तरुणांच्या त्यांच्या आई-वडिलांच्या मनात आज भीतीचं वातावरण आहे, त्याच भीतीचं भाजप द्वेषात रुपांतर करतात. भाजप कुटुंबातच भांडणं लावत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला.