मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधवांचा अखेर शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. १३ सप्टेंबरला भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याचा निर्णय़ घेतल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं. कोणातीही नाराजी नसल्याचं स्पष्ट करत आपण पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहोत आणि स्वगृही परतत असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व कार्यकर्ते आपल्या सोबतच असल्याचा दावा त्यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्यासोबत ९ जिल्हा परिषद सदस्य आणि गुहागर पंचायत समिती आणि ७३ सरपंच असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. आपले पुत्र विक्रांत यांना राजयोग असेल तर आमदार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नसून राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते या आठवड्यात शिवसेना, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव आणि आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तर राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते गणेश नाईक यांचा येत्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश होत आहे. राष्ट्रवादीसाठी हे आणखी काही मोठे धक्के असून आता अशा धक्क्यांची राष्ट्रवादीला जणू सवय झाली आहे. याशिवाय इतर काही नेत्यांचा प्रवेश शिवसेना, भाजपमध्ये होण्याची शक्यता आहे.


भास्कर जाधव यांचा परिचय