मुंबई : कोकणातील राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे भास्कर जाधव हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. पक्षांतर करताना नियमाप्रमाणे आधी त्यांना विधानभवनात जाऊन विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे त्यांनी खास विमानाने जात औरंगाबाद येथे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते मुंबई असा जाधव यांनी विमानाने प्रवेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेत प्रवेश करण्याआधी त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा देणे गरजेचे होते. त्यानुसार त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. अध्यक्ष विधानभवनात नसतील तर त्यांच्या सचिवांकडे राजीनामा अर्ज देता येतो. तो अर्ज सचिव फॅक्स किंवा ईमेलद्वारे अध्यक्ष जिथे असतील तिथे पाठवतात. त्यावर अध्यक्षांची स्वाक्षरी झाली की राजीनामा मंजूर होतो. अशी सर्वसाधारण प्रक्रिया विधानसभा सदस्यांच्या राजीनाम्याची असते. मात्र, त्यांचा राजीनामा मंजूर होण्यास विलंब अथवा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवसेना त्यांच्या प्रवेशासाठी कोणतीही रिस्क घेण्यास तयार नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी खास विमान दिल्याचे जोरदार चर्चा आहे.



आताच हे विमान त्यांना औरंगाबादहून मुंबईला आणणार आहे. मुंबईला परतल्यानंतर दुपारी २ वाजता मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश होईल. भास्कर जाधव हे मुळात शिवसैनिक. मात्र, काही कारणामुळे वाद झाल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अपक्ष निवडणूक लढविली. त्यांना यश आले नाही. मात्र, त्यांंनी शिवसेनेला आपली ताकद दाखवून दिली होती. त्यांना मिळणारा पाठिंबा पाहून खुद्द शरद पवार हे चिपळुणात गेले. त्यांच्या उपस्थित जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जाधव यांचे महत्व वाढले होते. त्यांनी आधी चिपळूणमधून राष्ट्रवादीला आमदार दिला. त्यानंतर मतदारसंघ पुनरचना झाली. त्यांनी गुहागरमधून निवडणूक लढवत राष्ट्रवादीला यश मिळवून दिले. ते गुहागरचे विद्यमान आमदार होते.


शिवसेना प्रवेश : ठळक बाबी


- भास्कर जाधव यांच्यासाठी शिवसेनेचे स्पेशल विमान
- स्पेशल विमानाने जाधव रत्नागिरीहून औरंगाबादला रवाना
- औरंगाबादला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन देणार आमदारकीचा राजीनामा
- आमदारकीचा राजीनामा देऊन आजच पक्ष प्रवेश व्हावा म्हणून शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्यासाठी खास विमानाची व्यवस्था
- आमदारकीचा राजीनामा देऊन जाधव लगेच मुंबईत येणार आणि मातोश्रीवर त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार 



राजीनामा प्रक्रिया


- पक्षांतर करताना नियमाप्रमाणे आधी त्यांना विधानभवनात जाऊन विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल
- मात्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे  औरंगाबादमध्ये आहेत
- अध्यक्ष विधानभवनात नसतील तर त्यांच्या सचिवांकडे राजीनामा अर्ज देता येतो
- तो अर्ज सचिव फॅक्स किंवा ईमेलद्वारे अध्यक्ष जिथे असतील तिथे पाठवतात
- त्यावर अध्यक्षांची स्वाक्षरी झाली की राजीनामा मंजूर होतो, अशी  सर्वसाधारण प्रक्रिया आहे
- भास्कर जाधव हेदेखील अशाचप्रकारे आज राजीनामा देणार होते
-  मात्र जाधव यांचा राजीनामा मंजूर होण्यास विलंब अथवा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे