Bhayandar Crime News : देशभरात धर्मांतर आणि लव्ह जिहाद प्रकरणावरुन गोंधळ सुरु असतानाच भाईंदरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन तरुणीला विनयभंय करून तिच्यावर इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी दबाव आणण्यात आला. विशेष म्हणजे या तरुणीला नकली बंदुकीने धमकावण्यात आले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनव्वर मन्सुरी आणि अजीम मन्सुरी अशी अटक आरोपींचे नाव आहेत. पीडित मुलगी ही 13 वर्षांची अल्पवयीन आहे. 1 जून पासून मुनव्वर मन्सुरी आणि अजीम मन्सुरी हे दोन तरुण तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करून बोलण्याच्या प्रयत्न करत होते. 12 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मुन्नवर मन्सुरी  याने तिला इमारतीच्या टॅरेसवर नेऊन तिचा विनयभंग केला असा आरोप तिच्या आईने पोलिस तक्रारीत केला आहे. 


यानंतर आरोपींनी या मुलीला बुरखा, चैन आणि अंगठी दिली. तसेच बुरखा घालून तयार राहण्यास सांगितले. बुरखा घालून ये आपण पळून जाऊन लग्न करू असे त्या मुलीला सांगितले. मात्र, पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर मुनव्वर याने पीडित मुलीला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून तू बुरखा घालून इस्लाम धर्म कबुल केला नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी दिल्याचा आरोपही पीडित मुलीच्या आईने केला आहे. हा प्रकार नागरिकांना कळल्यानंतर नागरिकांनी या तरुणाला चांगलाच चोप दिला आहे.


भाईंदर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात विनयभंगाच्या कलम 354, 354 (अ) तसेच 506 आणि  पोक्सो कायद्याच्या कलम  8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लव्ह जिहादवर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया


प्रेम हे प्रेम असतं, त्यात भिंती नसाव्यात अशी भावना, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. त्या मध्यप्रदेशातल्या जबलपूरमध्ये बोलत होत्या. दोन व्यक्ती ख-या प्रेम भावनेने एकत्र आल्या असतील, तर त्यांचा आदर करायला हवा, असंही त्या म्हणाल्या. मात्र प्रेमात कटुता, कारस्थान असेल तर वेगळा विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी लव्ह जिहादवर बोलताना दिली.